#देखें_वीडियो | ठाणे (महाराष्ट्र) के अंबरनाथ सर्कस मैदान के कई घरों में आग लगी। अधिक जानकारी की प्रतीक्षा है।
#WATCH_VIDEO | Fire breaks out in slum colony of Thane district; 35 huts gutted, none hurt
अंबरनाथमध्ये नवीन नाट्यगृहाच्या शेजारी भीषण आग लागली आहे. नवीन बांधलेल्या घरांना ही आग लागली आहे. सिलेंडरच्या स्फोटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे.
अंबरनाथच्या सर्कस ग्राउंड परिसरात आजा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तिथे असलेल्या झोपड्यांना आग लागली होती. या आगीत 32 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग इतकी भीषण होती की, इतर झोपड्यांमध्ये असलेले सहा ते सात गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. या स्फोटामुळे आग आणखीन भडकली होती. आगीची माहिती मिळता स्थानिक रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलवले. अग्नीशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग आता आटोक्यात आली आहे
या आगीचे स्वरूप मोठे असल्याने आनंदनगर एमआयडीसी चे अग्निशमन दल,उल्हासनगर अग्निशमन दल ,बदलापूर अग्निशमन दल, ऑर्डनस फॅक्टरी अग्निशामक दलास हि हा विजण्यासाठी पाचारण करण्यात आले, किमान दोन तास अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. या घटनेत झोपड्यांचे मोठे नुकसान झाले असून कोणती कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दल अधिकारी सोनोने यांनी दिली आहे.
या आगीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात झोपडपट्टीच्या परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. घरासोबतच घरातील सामानाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे. अग्निशमन दल आणि काही स्थानिक लोक ही आग विझवताना दिसत आहे.
थाणे में पहले भी लगी थी भयंकर आग
महाराष्ट्र में थाणे के एक इलाके में पिछले महीने भी भयंकर आग लगी थी. तब डोंबिवली के पास खोनी पलावा में एक इमारत हर मंजिल पर आग फैल गई थी. आग से हर मंजिल की बालकनी धू-धूकर जली. इससे आवासीय इमारत में कोहराम मच गया था. हालांकि, सूझबूझ से लोगों की जान बचा ली गई.